Contact Person WhatsApp Us
Get Directions Get Directions

दीपाली आणि रविभूषण दोघेही एमडी डॉक्टर. बीएएमएस आणि एमडी दोघांनीही सोबतच केले. वैद्यकीय सेवेतील ही जोडगोळी आयुष्यातही एकत्र आली. रविभूषण यांच्या कुटुंबात आई-वडील, मोठी बहीण, मोठा भाऊ आहेत. वडील शासकीय अध्यापक महाविद्यालयात प्राचार्य, नांदेड येथे विद्यापीठात कुलसचिव म्हणून निवृत्त. आई गृहिणी. मोठी बहिण शिक्षण शास्त्रात डॉक्टरेट करुन दिव्यांग मुलांची शाळा चालवते. मेहुणे डॉक्टर. तेही आयुर्वेदिक कॉलेज सायन येथे रसशास्त्र विभागात असोसिएट प्रोफेसर म्हणून कार्यरत. मोठा भाऊदेखील वैद्य असून, तो गाडगीळ सरांचा शिष्य आहे. तर पत्नी दीपाली डॉक्टरकीसह सहयोगी प्राध्यापक म्हणून शिकवतात. असे हे आयुर्वेदप्रेमी सोनवणे दाम्पत्य.
दोघांनीही गणेशवाडी आयुर्वेदिक कॉलेज, नाशिक येथून बीएएमएस करुन पुण्यातल्या टिळक आयुर्वेद महाविद्यालयातून एमडी केले. एमडीला असताना दिवंगत वैद्य विलास नानल व  वैद्य नरेंद्र पेंडसे यांच्याकडून ताराचंद हस्पिटलमध्ये मार्गदर्शन घेतले. वैद्य वैभव मेहता यांचाही गुरु म्हणून सहवास लाभला आणि त्यांचा आयुर्वेदाकडे बघायचा दृष्टीकोन बदलला. वैद्य रा. ब. गोगटे यांच्याकडून अग्निकर्म आणि विद्ध कर्म प्रत्यक्ष शिकता आले, याचे ते स्मरण करतात.
डॉ. रविभूषण म्हणतात, आमच्या पंचकर्म विभागातील आमचे गुरु वैद्य राजेंद्र हुपरिकर आणि वैद्य प्रमोद कुलकर्णी यांचे मार्गदर्शन नेहमीच मोलाचे ठरते. त्यांच्यामुळेच हृद्रोग, मूत्रविकार, आमवात विविध त्वचा विकार असे बहुसंख्य रुग्ण व त्यांच्या अवस्था, विविध पंचकर्म आम्हाला बघायला मिळाले. त्यामुळे पुण्यात त्या तीन वर्षात अनेक गुरूंचा, मित्रांचा सहवास लाभला अनेक व्याख्याने, सेमिनार ऐकली. एकंदरीत आयुर्वेद शास्त्राच्या अभ्यासाची खोली किती मोठी आहे याचा थोडक्यात अंदाज आला. नाशिकमध्ये आल्यावर अनेकांचे मार्गदर्शन मिळत गेले. त्यातील काही मित्र, तर काही सिनिअर वैद्य मंडळी, त्यामुळे तेदेखील सगळे गुरु प्रमाणे ठरतील.
आयुर्वेदातील माझी वाटचाल देवकृपेने अद्याप चांगलीच आहे. सुरुवातीच्या काळ थोडा खडतर होता; कारण नुकतेच लग्न करून आम्ही नाशिकमध्ये आलो होतो. त्यामुळे आम्हाला लवकरात लवकर स्थिरावणे गरजेचे होते. ‘टिळक’मधून एमडी केल्याने आम्हा दोघांनाही नाशिकमधील सप्तशृंगी आयुर्वेद महाविद्यालयात येथे लगेच लेक्चरर म्हणून पंचकर्म विषयात नोकरी लागली. त्याचवर्षी क्लिनिकचे काम सुरू केले. भावाचे क्लिनिक सुरुवातीपासून होतेच; पण तिथे मी फक्त शनिवार-रविवार पुण्यातून यायचो आणि नवीन क्लीनिक सुरू करणेदेखील गरजेचे होते. त्यामुळे स्वतंत्र दुसरे क्लिनिक घराजवळ टाकले आणि कॉलेज व प्रॅक्टिस अशा दोन्ही गोष्टी सुरु केल्या. दोन वर्षांनी लगेचच नाशिकमधील सर्वात प्रथम चार वैद्यांनी एकत्र येऊन ‘सर्वम आयुर्वेद व पंचकर्म सेंटर’ हे अद्ययावत व प्रशस्त सेंटर सुरू केले. त्यामुळे घर, कॉलेज आणि दोन क्लिनिक अशी कसरत सुरु झाली. पण त्यात खूप समाधान आहे. आता तीन वर्षापासून कॉलेज सोडून पूर्णवेळ प्रॅक्टिस असेच चालू आहे. घराजवळील भाड्याचे  क्लिनिकचे रूपांतर आता स्वतःच्या ‘आयुस्पर्श पंचकर्म क्लिनिक’मध्ये झाले, याचाही आनंद आहे.
हरितविश्व हा नाशिक येथील वैद्यांचा एक ग्रुप आहे. यामध्ये आम्ही त्र्यंबकेश्वरजवळील एका डोंगरावर अनेक झाडे लावली आहेत. त्यांना वेळोवेळी पाणी देणे, तसेच पावसाळ्यानंतर नवीन ठिकाणी झाडे लावणे हा उपक्रम आम्ही दोन-तीन वर्षापासून करत आहोत. राष्ट्रीय पातळीवरील वैद्यकीय संघटना असलेल्या ‘निमा’चे कार्यकारिणी सदस्य म्हणूनही रविभूषण काम पाहतात. महाराष्ट्र संमेलन या संघटनेतही ते कार्यकारणी सदस्य म्हणून कार्यरत आहेत. वारकर्यांना मोफत आयुर्वेद उपचार देणे हे दरवर्षी त्रंबकेश्वरमध्ये विश्वपंढरीतर्फे शिबिर आयोजित होत असते. त्यात त्यांचा सहभाग नेहमीच असतो. नाशिक वैद्यांकडून विद्यार्थ्यांसाठी घेतल्या जाणार्या गुरुकुलमध्ये वक्ता व आयोजक म्हणून ते सहभागी होतात. यासह वृत्तपत्रलेखन, मुलाखती, सोशल मीडिया आदींच्या माध्यमातून आयुर्वेद प्रसाराचे काम सुरु आहे.
केशायुर्वेदविषयी बोलताना रविभूषण म्हणतात, वैद्य हरीश पाटणकर यांचे नाव सर्वप्रथम कळाले ते पुण्यातच. आम्ही एमडीला असताना वैद्य स्नेहल हरपुडे ही शालाक्य विभागात शिकत होती आणि आम्ही पंचकर्म विभागात. तेव्हाच स्नेहलमार्फत हरीशच्या कार्याची माहिती मिळाली होती. त्यावेळी त्यांची पुण्यातच प्रॅक्टिस चालू झाली होती. फक्त प्रयोगिक तत्वावर असणारा केशायुर्वेद हा विषय प्रतिथयश ब्रँड बनेल, असे आम्हाला वाटले नव्हते. पण ‘हरीस्नेह’ या जोडीला सुरुवातीपासूनच याची जाणीव होती आणि त्यानुसार त्यांची वाटचाल सुरू होती. केशायुर्वेद ही अतिशय वेगळी संकल्पना आहे. त्यामुळे ती नक्कीच यशस्वी होणार यात काही शंकाच नाही. म्हणूनच एवढ्या कमी कालावधीत एवढे प्रचंड उपकेंद्र भारतासह परदेशातही उभारले गेले आहेत. याचा नेहमीच आम्हाला मित्र आणि केशायुर्वेदचा प्रमुख म्हणून अभिमान वाटतो. केशायुर्वेद सुरू केल्यापासून वैद्यकीय क्षेत्रामध्ये नक्कीच बदल झाला आहे. रुग्णांमध्ये एक नवीन विश्वास निर्माण झाला आहे. त्यांचा प्रतिसादही उत्तम मिळत आहे.
केशायुर्वेदला आयएसओ प्रमाणपत्र मिळालेले असून, बीव्हीजीचे पाठबळ असल्याने त्याच्या गुणवत्तेचा आलेख उंचावताना आम्ही पाहिला आहे. निरंतर संशोधन आणि चर्चात्मक विश्लेषण हा केशायुर्वेदचा गाभा. आणखी एक महत्वाची बाब म्हणजे उपकेंद्रचालकांकडून येणार्या प्रत्येक सूचना आणि कल्पनांचे ‘हरीस्नेह’ जोडीकडून होणारे स्वागत. त्या कल्पना प्रत्यक्षात आणण्यासाठी होत असलेला प्रयत्न. अलिकडेच केसांसाठी एखादा अवलेह (च्यवनप्राश सारखा) असावा, असे टाकले आणि अवघ्या काही महिन्यातच या टीमने अथक संशोधन करून नवीन अवलेह तयार केला. तो अतिशय परिणामकारकही आहे. हे प्रचंड आशादायी चित्र  आहे. आयुर्वेदात संशोधन कमी असते या वाक्याला छेद देत संशोधनाबद्दल या टीमला अनेक पुरस्कार प्राप्त झाले आहेत. अनेक नामांकित कॉन्फरन्समध्ये पेपर आणि पोस्टर प्रेझेंटेशनला गौरवले आहे. त्याचाही खूप आनंद वाटतो. ‘विश्वास, परंपरा, शास्त्रशुद्धता’ हे ब्रीदवाक्य घेऊन केशायुर्वेदचे काम सुरु आहे.
    आपल्या क्लिनिकमधील केंद्राविषयी बोलता दीपाली-रविभूषण म्हणतात, गेल्या काही वर्षांत अनेक चांगले अनुभव येताहेत. एखादी नवीन संकल्पना जनमानसात रुजू होताना त्रास देखील होतो. काही वैद्यांना आयुर्वेद नाही, असे वाटते. पण जेव्हा ते कसे आयुर्वेदीय आहे, हे पुस्तकामार्फत सांगितले जाते, त्यांना ग्रंथाचे दाखले दिले जातात. तेव्हा ही संकल्पना किती सुंदर आहे, हे पटायला सुरुवात होते. रुग्णांना हरीश सरांची टीव्हीवरची मुलाखत असो, बीव्हीजीचा सपोर्ट असो, जगभरातले सबसेंटर असो की वेबसाइटवरील माहिती असो. हे सगळे दाखवले आणि ‘बिफोर’-‘आफ्टर’ची उदाहरणे बघितली की, रुग्णांचा विश्वास बसायला लागतो. त्यातून रुग्ण वाढतात. सुरुवातीला नाशिकमधील पहिले सबसेंटर मला हवे होते. पण मला त्यादरम्यान अपघात झाला आणि मला थांबावे लागले. ही सिस्टीम प्रचंड पारदर्शक आहे. लपवाछपवी काही नाही. जे आहे ते सरळ व प्रामाणिकपणे काम करणार्या लोकांची ही टीम आहे. त्यामुळेच तर मित्र असून, जे सिस्टीममध्ये आहे, त्यानुसारच मला सबसेंटर मिळाले. ही टीम नेहमीच मदतीसाठी तत्पर असते. सुरुवातीला आमच्यासारख्या वैद्यांकडून प्रचंड चुका व्हायच्या. पण त्या कशा सुधारल्या पाहिजेत, यासाठी या टीमकडून नेहमीच मदत होत राहते.
केशायुर्वेद वैद्याचे वैद्यत्व टिकवते आणि त्याला एक सुपर कन्सल्टंटचा दर्जादेखील देते. आता तर वेबिनार सुरू केल्यापासून आपल्या क्लिनिकला बसल्याबसल्या अनेक सुंदर, ज्ञानवर्धक करणारी व्याख्याने ऐकता येतात. त्यामुळे मोबाईलचा ग्रुप असो, वेबिनार असो, इंटरनॅशनल सिम्पोसियम असो. अशा सगळ्या गोष्टी आणि 19 जुलैचा प्रेरणादायी कार्यक्रम असो. त्यामुळे केशायुर्वेदबद्दल जेवढे बोलावे लिहावे तेवढे कमीच आहे.केशायुर्वेद अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी सध्या विविध शिबीर घेणे, फेसबुक इत्यादी सोशल मीडियाचा वापर करणे, वैद्यांमध्ये जनजागृती निर्माण करणे, तसेच विविध लेख लिहिणे, विद्यार्थ्यांना काही गोष्टी समजावून सांगणे या गोष्टी हे सोनवणे दाम्पत्य नित्यनियमाने करीत आहे. लेखमालेतून यशस्वी केसेस मांडण्याचा त्यांचा मानस आहे. ब्रँड अँबेसेडर म्हणून नेहमीच ते स्वत:ला भाग्यवान समजतात. केस म्हणजे केशायुर्वेद. केस द्याल, केस उगवतील. हे भविष्यात होणारच आहे केसांचे रुग्ण सर्व वैद्यांना किंवा इतर डॉक्टरांना विचारले की तुम्ही हेअर सॅम्पल घेत नाही का? केस कसे बरे करता हो? जेव्हा असे होईल तेव्हाच खरे केशायुर्वेदचे कामे पूर्णत्वाला गेले असे म्हणायला बरे वाटेल. त्यासाठी केशायुर्वेदच्या टीमचा एक सदस्य म्हणून जोमाने प्रयत्न करण्याचे दायित्व आमच्यावर आहे, असे रविभूषण सांगतात. आयुर्वेद आणि योग या क्षेत्रातील करिअरच्या संधी प्रचंड आहेत फक्त त्या आपल्याला कळल्या पाहिजेत. आयुर्वेद हा जगातिक झाले आहे. त्यामुळे भारतातच नव्हे, तर भारताबाहेरही प्रचंड संधी उपलब्ध आहेत. त्याचा आपण लाभ घेतला पाहिजे.
आतापर्यंत मला केशायुर्वेदच्या प्रॅक्टिससाठी ‘बेस्ट सबसेंटर’ पुरस्कार मिळाला  आहे. केशायुर्वेद प्रश्नमंजुषा स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांक मिळाला आहे. पारंगत वैद्य म्हणून नाव आहे. एमडीला सुवर्णपदक मिळाले आहे.

 

Organization Details

नाव : वैद्य रविभूषण सदाशिव सोनवणे ,
         वैद्य दिपाली रविभूषण सोनवणे
शिक्षण : बीएएमएस, एमडी (पंचकर्म)
क्लिनिकचे नाव : 1) आयुस्पर्श पंचकर्म क्लिनिक, 2) सर्वम आयुर्वेद पंचकर्म सेंटर
पत्ता : पंडित कॉलनी, गंगापूर रोड, नाशिक.
मोबाइल : 9421605196, 9421607548
ईमेल : [email protected]
कधीपासून प्रॅक्टिसमध्ये : 2008 पासून
केशायुर्वेदशी संलग्नित : 2017 पासून

Our Specialities

1. One stop solution for all your hair and skin problem.

2. Accurate diagnosis and perfect treatment.

3. Complete Scalp Analysis , Photography , Microscopic Testing as well as HQ (Hair Quotient ) and HP (Hair Prakruti ) analysis.

4. Authentic Ayurvedic treatment from team of expert doctors like Ayurvedacharya’s , Cosmetologist’s , Trichologist’s.

5. Wide range of hair and skin care herbal products.
About